एक डोह अनोळखी…
मंगेश कुळकर्णी ने लिहिलेली 2 – 2 ओळींची ‘सूर’ ह्या शब्दाभवती गुंफलेली कडवी…
आणि गायलेली देवकीने…
सुरावट बांधलीय शांक नील ह्यांनी…
मंगेश माझा आवडता कवी..
हरहुन्नरी मित्र…
तिरसट वाटेल कुणाला इतका मुंहफट…
पण तो म्हणतो त्यात तथ्य असतं…
त्याला सांगितलं दर दोन सीन च्या मध्ये असं कडवं हवं जे मागच्या सीन ची सांगता करेल आणि पुढच्याची सुरुवात…
तर म्हणाला जे हवंय त्याचा निबंध लिहून पाठव…
मग सविस्तर पान भरून लिहून पाठवलं…
‘सूर’ हा नंदिनी चा आत्मा आहे ..
संगीत तिच्या नसानसात आहे…
वरकरणी बेछूट बेभान वाटणारी ती जीवनाचा प्रत्येक कंगोरा असोशीने अनुभवते आहे…
त्यामुळे प्रत्येक 2 ओळी सुरांशी संदर्भीत असाव्या… ‘
एव्हाना त्यानं नाटक वाचलं होतं …
आणि एक दीड दिवसात त्यानं अखंड लिहून पाठवलं ….
‘मला हे आणि असं सुचतंय’ असं म्हणाला…
मी वाचल्यावर अर्थानुरूप त्या त्या सीन मध्ये ते पेरलं…
आणि काकडे काकांना म्हटलं कधी रेकॉर्डिंग करू या???
कोण संगीत करेल???
‘शांक नील’ . ‘
कोण गाणार???’ काकांनी विचारलं.
म्हटलं ‘देवकी गाईल’.
‘बोललीस तिच्याशी???’
म्हटलं ‘नाही अजून, पण बोलते… ‘
देवकीचा आवाज भेदत आणि चिरत जायचा…
आणि दमसास खूप deep होता…
mature होता…
नंदिनीच्या भावनांना वाट करून देण्यासाठी अत्यंत योग्य वाटला…
शांक नील ना सांगितलं तेव्हा त्यांनाही योग्य वाटलं…
तिला फोन केला ….
नाटकाची कथा… ती कडवी कुठं येतात आणि त्याचे लागेबांधे कुठून कसे जातात…
तिची उत्सुकता …
माझं भरभरून सांगणं…
म्हटलं तर थोड्या फार फरकाने समवयीन होतो…
कधी करायचं आणि कुठे… ????
शशांक वालचंद च्या स्टुडिओ त…
रात्री 7 च्या शिफ्ट मध्ये….
दिवसा ग्रँड आणि technical रिहअर्सल्स चालू आहेत आणि शांक नील आणि शशांक चा स्टुडिओ दोन्हीही मोकळे नाहीत…
आविष्कार चं production , त्यामुळे उत्तमोत्तम लोकं विनामूल्य काम करायची….
शशांक लालचंद हा त्यातलाच एक…
एरव्ही त्याच्या स्टुडिओत फक्त लताबाईंचं रेकॉर्डिंग व्हायचं….
पण आविष्कार साठी सगळं विनामूल्य आणि स्वतः शशांक जातीनं रेकॉर्डिस्ट म्हणून उभा रहायचा….
अग नानी, कधी आणतेयस music रेकॉर्ड करून… त्यावर rehearsal कधी करणार आम्ही…
अग, दोन सीन च्या मध्ये आहे ते… त्यामुळे तुमचे queue त्याच्यावर नाहीयेत… तुमचे कपडे बदलणे आणि सेटवरचे फेरफार तेव्हढ्या वेळात होतील … इतकं sufficient ठेवलंय…
आणि माझं गाणं… ?
ते तुझ्या ट्रान्स मध्ये आहे… फक्त सुरुवातीचं sync पकडायचं…
हम्मम….
ह्या हम्मम चा ध्वनी खूप विचारांती घुमणारा…
सुलभा एक सिनियर आर्टिस्ट नक्कीच होती नाट्यसृष्टीतली…
प्रत्येक गोष्ट नेमकी आणि जिथल्या तिथे … technically करेक्ट…
मग नाटक commercial नसलं तरी professionally चालणारं होतं…
मीही नाटकं आणि त्यांचे प्रयोग नेमकेच केले असले तरी संस्कार तेच होते… त्यात कुठलीही हयगय मलाही चालणारी नव्हती…
बॅकग्राऊंड music वर मुख्यत्वेकरून lighting आणि सेटिंग चे queues असतात… प्रकाश येणं जाणं तीव्र किंवा मध्यम होणं…
प्रत्येक faculty चे आपले असे खूप बारकावे असतात… आणि दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे हे पावलोपावली प्रत्येकजण विचारून समजवून घेत असतो …
जिथं clash होतंय तिथं नीट बसून मार्ग काढला जातो…
आणि जो अपेक्षित परिणाम आहे तो साधला जातोय का … हे बघितलं जातं…
कुठलीच गोष्ट ‘ठीक आहे बघू नंतर ‘ ह्या सदरात मोडत नाही…
प्रयोगाला 6 दिवस उरले होते, जेव्हा आम्ही रेकॉर्डिंग साठी स्टुडिओत घुसलो…
शांक नील मधल्या शांक ने विचारलं ‘किती दिवसात करतोय हे आपण… ?’
‘आज रात्री मध्ये …. ‘
‘काय…’
‘हो … उद्याच्या rehearsal मध्ये वाजवायचं आहे… ‘
त्याने अप्पा वढावकर ला पेटी घेऊन बोलावलं…
देवकी, तो, अप्पा आणि मी…
बाकी साजिंदे आपापली वाद्य जुळवत होते…
मी प्रत्येक कडव्याचा अलीकडचा भाव आणि नंतर सुरू होणाऱ्या सीनचा टेम्पो सांगत होते,
त्याबरहुकूम music चं prelude ठरत होतं आणि तो चाल गुणगुणत होता…
देवकीला त्यांच्या भाषेतल्या टिप्स देत होता …
ती त्याबरहुकूम गाऊन दाखवत होती…
अप्पा मधेच एखादी अशी जागा घ्यायचा की तिघेही पुन्हा नव्याने त्या हरकतीसकट ते कडवं घ्यायचे…
तासाभरात नील सांगत आला…
आम्ही तयार आहोत…
‘आम्हीही… ‘ म्हणत आम्ही चौघे हसत उठलो …
Neelkanti Patekar®©
P. S. ‘एक डोह अनोळखी’ ह्या नाटकाचं नभोवाणी रूपांतर सुलभा देशपांडे आणि विनायक पै ह्यांच्या आवाजात ह्या लिंक वर ऐकता येईल.
आणि माझं मनोगत ह्या लिंकवर
एक अनोखा अनुभव…