देवाचं गणित…


तू काहीही म्हण रे बाप्पा, पण माझे सगळे हिशेब इथेच मिटवून टाक… नंतर काही शेपटं नको ठेवूस पुढच्या जन्मात परतफेडीसाठी.. मला मस्त मोकळं ढाकळं जगू दे… विनापाश with मागचा जन्म…

माझा आणि देवाचा हा असा अधूनमधून डायलॉग होत असतो…

आणि हो … जे अकाउंट्स ताळेबंद करतोयस ते मला कळू दे काय ते…

हा वरून मी केलेला उत्साही शहाणपणा.

देवही काय कमी नाही .. आकाशातला बापच तो … म्हंटलाच लगेच… करूनच टाकतो हिशोब.. प्रत्येकाची खतावणी ओपन.. जाम त्रांगडं होतंय… अगोदरच्या युगात एव्हढी कॉम्प्लिकेशन्स नव्हती… पण ह्या कलियुगात कुठली पट्टी कुठं पढवतात आणि कुठला हिशोब कुठं चुकता करतात .. ट्रॅक ठेवणं अशक्य… पण तरीही… मी तुझा हिशोब tally मध्ये टाकतोच..

मीही म्हटलं हुश्श! कर नाही त्याला डर कशाला??? विचार मनात उमटून मिटायच्या आत नोटिफिकेशन्स चा रिंगटोन अव्याहत सुरू झाला.. आणि एक एक file येऊन पडायला लागली ना पुढ्यात…
दिवस 1 ला ते 65 x 365 + आजपर्यंतचे दिवस … बोबोबोबोबोबो
मेरा दिल गरररररकन चक्कर खा गया… अगदी 100री पार करून जगणार म्हटलं तरी उरली किती वर्षं.. 34 पूर्ण आणि काही दिवस… आणि ह्या उर्वरित काळात 65 वर्षांची tally करायची…
चक्रवाढव्याजासकट ..
कोण बोललं..?
अरे, मी बोलतोय, हिशोब मांडू ना!
माझा दम घुसमटला…
नारायणा.. देवा परमेश्वरा.. म्या पामराने जे काय केलंय day 1 पासून… आणि त्याचा लेखा जोखा आहे तुझ्याकडे…आणि वर त्यावर तू चक्रवाढव्याज …
लावणार म्हणजे काय… ते मीटर चालूच असतं बाजूला…
आईशप्पथ … रे तुज्या …

मनातल्या मनात मन स्वतःवरूनच सणसणीत मोकळं केलं एका दमात…
Counting चालूच आहे…नाही … लक्षात असू दे म्हटलं …

भोग आपल्या कर्मांची फळं…असं म्हणतात … का???
हम्मम्म्म…

माझा हुंकार जगाच्या अंतापर्यंत लांब असू शकत होता…
देवाचं गणित पक्कं च आहे.. होतं.. आणि असणारही आहे..
प्रत्येक एन्ट्रीच डबल एन्ट्री बुक किपिंग मधली, एकाचं डेबिट होताना दुसऱ्याचं क्रेडिट मध्ये जातं…
आणि हे असं अव्याहत चालूच असतं ना… अsssव्याsssहsssत… थांबतsssच नाही…
म्हणजे तुम्ही योग्यच वागणं आलं.. पण तुमच्या काटेकोर … अssगssदी बरोबर वागण्याने कुणाचा तरी तोटा होणारच… म्हणजे परत डेबिट आलंच… अsssशsssक्य आहे…

आणि तो खतावण्या लिहिणारा चित्रगुप्त..

‘चित्र’ म्हणजे त्याची फोटो मेमरी असणारच. आणि ‘गुप्त’ म्हणजे बेणं लैच बाराचं असनार…
कळणारच नाही कुठली एन्ट्री कुठं फिरतेय…
म्हणून 84 लक्ष योनीतून फिरायला लागतं…
मग जगभरच्या लै म्हनजे लैच थोरामोठ्यांचे इचार आले ना राव…. ह्येनचं काsssय ! आत्ता बोलाsssच!
देवाकडं उत्तर तयारच!


तुझी सद्सद्विवेक बुद्धी जागरूक झाली ल्येका… त्यांची अजून …
येव्हढी शिकली सवरलेली माणसं म्हणायची आणि ….

त्याचा काय संबंध … ???!!!
सद्सद्विवेकबुद्धी हे आपलं अंतर्मनातलंही अंतर्मन… ते जागृत कुणाचं आणि कधीही होतंय .. होऊ शकतंय…
देव म्हणजे काय रे? दगडाची मूर्ती ??? की मांत्रिकानं लावलेला कौल??? असं का sss ही नाही रे माझ्या लेकरा! देव म्हणजे आपल्यातलं भलं माणूस …

एकदा का तू आत वळलास .. आणि डोकावलंस स्वतःच्या आsssत आsssत… की प्रवास सुरु झालाच म्हणायचं… परतीचा… आपल्याकडून आपल्याकडं…
स्वतःशीच कोण काय खोटेपणा करणार का लांडीलबाडी करणार की दुश्मनी करणार की फसवणार… का मारामारी करणार की जीव घेणार स्वतःचाच.. का बळजोरी करणार स्वतःवर… ज्येवढं म्हणून वाईट आहे ते करणार कsssसं???
मग सगळ्या एन्टऱ्या पलटणार…

अरे मी म्हणजे तरी कोण रे??? स्वतःकडे वळलेला तूच तर आहे मी… !!!
म्हणजे हेsss अहं ब्रह्मास्मि…!!! आपणच आपल्या आत डोकावलं की दिसतं ते ब्रह्म!!!
दिसलं ते ब्रह्म …
आणि केला?? की झाला?? तो ब्रह्मघोटाळा…

उपरती एका क्षणात येते बघ! आणि ती आली की tally पण लगोलग होतेय…
देव नाही देव्हाऱ्यात… हेच खरंय ल्येका…. देव माझा माझ्यात….


Neelkanti Patekar™&©
26th Oct. 2020
16.30 hrs.

6 thoughts on “देवाचं गणित…”

 1. देवाचे गणित………. खरोखर विचार करायला लावणारे

  Like

 2. गणिताचं गारूड..सर जो मेरा चकराकर और दिल धडधडकार सोचमे पड गया….
  माझा कुठला बरं हा जन्म ? अजून किती बरं बाकी माझे लक्ष ८४शी ठसे कसे कसे असतील ?..
  काही असो…मांडू दे त्याला हिशेब ..मेरे करम की गती और गणित उसे ही लिखने दो. मै solemnly हंसिनी बनके उडती फिरू..वही सही..शुचिरूप ..आत्मरूप!

  Like

 3. देव अजब गारोडी आणि
  नीलू तुझं गणिती गारूड…. इतकं कि सर जो मेरा चकराकर,दिल मेरा धडधडकाकर…सोच में पड गया… मेरा यह कौनसा जनम और कितने और बाकी?.. माझे लक्ष८४शी ठसे कसे कसे आहेत? तो ठेवेल त्याचे हिशेब..माझी कर्मगती तिही त्यानेच ठरवली असेल… मी solemnly हंसिनी बनून उडत फिरावं…वही सही…शुचिरूप…आत्मरूप!

  Like

 4. देवाचे गणित…. खरच खुप अजब आहे. माणुस म्हणुन जन्माला आल्यावर आपण उगाचच विचार करत बसतो . स्वच्छंद भरारी घेतली कि ८४ लाख योनीचे गणित करायला वेळही लागत नाही. ….

  Like

 5. देवाचे गणित…. खरच खुप अजब आहे. माणुस म्हणुन जन्माला आल्यावर आपण उगाचच विचार करत बसतो . स्वच्छंद भरारी घेतली कि ८४ लाख योनीचे गणित करायला वेळही लागत नाही.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s