गुरफटलेलं बालपण…

शुभ निद्रा … थंडीत गोधडी घेऊन झोपायची मजा काही औरच…. आमचे आजोबा आम्ही लहान असताना दुलई घेऊन झोपायचे.. ती दुलई डोक्यावरून घेतली की आत चांदण्याच चांदण्या दिसायच्या … आणि आम्ही चिल्ले पिल्ले ती डोक्यावरून ओढून त्या मोजायचो.. ज्याला जितके आकडे यायचे तिथपर्यंत त्याची मजल… काही वर्षांनी कळलं.. त्या चांदण्या नव्हत्या, जिथे त्या दुलईचे टाके होते, त्या छिद्रातून बाहेरचा प्रकाश आत यायचा … आणि आम्हाला त्या चांदण्या वाटायच्या… लहानपणीचं ते make believe जग.. त्याची सर कळत्या वयाच्या आयुष्याला कधीच आली नाही कधी…

आज लिहितानाही त्या चांदण्या मस्त चमकत होत्या डोळ्यासमोर…

आणि ही दुलई होती खूप special.. अशी रुईच्या कापसाची शिवून मस्त आतून बाहेरून फुलांचं सॉफ्ट कापड लावलेली …

आम्हाला झोप आमच्याच पांघरुणात यायची पण सगळ्यांना घुसायचं असायचं आजोबांच्या दुलईत….

त्या वयाला गादीच अंगावर घेतल्यासारखं वाटायचं…

हो.. आणि हे आमचे आजोबा म्हणजे आईचे बाबा.. आमचं आजोळ ते… लेकीची लेकरं म्हणजे दुधावरच्या साईसारखी… आजोबा म्हणायचे … (खरं तर म्हण अशी होती , जावयाचं पोर हरामखोर… 💁‍♀️💁‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🙆‍♀️🙆‍♀️😂😂)

आपलं पांघरूण हे आपल्याला जोजवत असतं… वर्षानुवर्षे… आणि त्याला वयाचं बंधन नसतं… अगदी मनातल्या मनातलं हं हे…

Neelkanti Patekar ™ & ©

31st October 2020. 23.32 hrs.

One thought on “गुरफटलेलं बालपण…”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s